महाराष्ट्र

सात दशकांचा सहजीवनाचा प्रवास संपला; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आठवणीत शांतादेवी भावुक

मुंबई: पद्मश्री शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी शांतादेवी पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत सहजीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. “डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासारख्या कर्तृत्ववान पतीची साथ लाभणे हे माझे भाग्य होते. त्यांनी आयुष्यभर माणसं जोडली, अनेकांचे संसार उभे केले आणि असंख्य लोकांना आधार दिला. त्यांच्या पत्नी म्हणून हे सर्व जवळून पाहण्याची संधी मिळाली, याचा कायम अभिमान राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुमारे सात दशकांचा सहजीवनाचा प्रवास त्यांच्या निधनाने थांबला असला, तरी त्यांच्या आठवणी कायम सोबत राहतील, असे सांगताना शांतादेवी पाटील भावूक झाल्या.

प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेल्या शांतादेवींनी संसार, मुलांचे संगोपन आणि संस्कारांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यामुळेच डॉ. डी. वाय. पाटील यांना शिक्षण, समाजकारण आणि राजकारणात पूर्णवेळ कार्य करता आले.

त्या म्हणाल्या, “साहेब सतत मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी कामानिमित्त दौऱ्यावर असायचे. त्यामुळे मुलांची जबाबदारी माझ्यावर होती. मी कधीही त्याबद्दल तक्रार केली नाही. मुलांना चांगले शिक्षण, उत्तम संस्कार आणि शिस्त देण्याचा प्रयत्न केला. साहेब बाहेर असले तरी त्यांचे मुलांकडे कायम लक्ष असायचे. पाचही मुलांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे, कष्टाची किंमत समजून घ्यावी आणि शिस्तीने आयुष्य जगावे, यावर त्यांचा नेहमी भर होता.”

शांतादेवी पाटील यांनी व्यक्त केलेल्या या भावना डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कर्तृत्वामागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सहचारिणीचे योगदान अधोरेखित करणाऱ्या ठरल्या आहेत. त्यांच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

6 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

11 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 दिवस ago