महाराष्ट्र

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा खांब कोसळून बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता, मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटी, चिकूवाडी, मार्वे रोड येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही मुले स्वतःच दहीहंडी फोडत होती. हंडीची दोरी झाडाला तसेच तळमजल्यावरील विटांच्या खांबाला बांधण्यात आली होती. हंडी फोडण्याच्या प्रयत्नादरम्यान हा विटांचा खांब अचानक कोसळला. यामध्ये रुद्र कदम (वय ७ वर्षे) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर रुद्रला तातडीने मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयाच्या माहितीनुसार तो ‘Brought Dead’ अवस्थेत आणण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच वॉर्ड कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, उत्सवाच्या आयोजनातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लहान मुलांकडून अशा प्रकारे उत्सव साजरा केला जात असताना पालक, स्थानिक मंडळे आणि आयोजकांनी आवश्यक सुरक्षा उपायांची काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

15 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

15 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

15 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

15 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

16 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

16 तास ago