महाराष्ट्र

हायकोर्टाच्या निकालानंतर 48 तासांतच दमानियांचं मोठं विधान; काय म्हणाल्या…

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धडाडती तोफ धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यात मोठा दिलासा दिला होता. पण या निकालानंतर 48 तासांच्या आतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा मुंडेंविरोधात तलवार उपसली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंना कोणतीही क्लिन चीट मिळाली नसल्याचं ठणकावलं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागातील घोटाळ्याप्रकरणी दिलेल्या निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपण या प्रकरणी थेट आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की, धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वापसी करू नये. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की, पहिले धनंजय मुंडे आणि नंतर माणिकराव कोकाटे यांच्यासारखे कृषिमंत्री झाले. पण मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांची चुकीची मांडणी, सरकारी वकिलांचा घोळ, यामुळे सगळं मुंडेंच्या पथ्यावर पडलं असल्याची संतप्त प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली आहे.घोटाळ्यात अटक केलेला अमित साळुंके शिंदे पिता-पुत्राचा निकटवर्तीय, संजय राऊतांचा धक्कादायक दावा

मुंबई उच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडेंविरोधात कृषी विभागातील झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन्हीही याचिका फेटाळल्यानंतर अंजली दमानिया आता आणखी आक्रमक झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, परवा संध्याकाळी हायकोर्टाने ऑर्डर पास केली आहे. मला यामध्ये काय त्रुटी वाटत आहेत त्या मी मांडणार आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत,असंही त्यांनी सांगितलं.

तसेच शासनाकडचे जे वकील होते, त्यांनी अतिशय शातीरपणे सगळं मांडलं. जे दोन जीआर होते, वेगवेगळ्या विभागाचे आहेत, असंही दमानिया यांनी म्हटलं. वकिलांनी न्यायालयात जे सगळं मांडलं ते चुकीचं आहे. या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराचा कुठेही उच्चारही केला नाही. या वकिलांकडून भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेलेला नाही. यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळालेली नसल्याचंही त्यांनी ठणकावलं आहे.

दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना या संपूर्ण प्रकरणी चॅलेंज करायची गरज असल्याची भूमिकाही मांडली. त्या म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय मांडण्याची गरज आहे. माझा लढा लोक आयुक्तांसमोर चालू आहे. सत्यमेव जयते हे धनंजय मुंडे यांना शोभत नाही. वी राधा ज्या सचिव होत्या, त्यांचा अहवाल कधीही मांडण्यात आला नाही. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आठवेळा सचिवाने हे सर्व चुकीचं होतं असल्याचं सांगितल्याचंही दमानिया यावेळी म्हणाल्या. .

भाजप आमदार सुरेश धस यांनी तब्बल 200 कोटींचा तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र,मुंबई उच्च न्यायालयानं मुंडेंना दिलासा देताना त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारच्या कृषी विभागानं केलेल्या कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णय हा नियमानुसार झाल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

प्रश्न: मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना क्लीन चीट दिली का?

उत्तर: न्यायालयाने याचिका फेटाळल्या पण ‘क्लीन चीट’ दिली असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले नाही.

प्रश्न: अंजली दमानिया पुढे काय करणार आहेत?

उत्तर: त्या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केलं आहे.

प्रश्न: कोणत्या मुद्द्यावरून दमानिया नाराज आहेत?

उत्तर: सरकारी वकिलांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा न्यायालयात मांडलाच नाही, यामुळे त्या नाराज आहेत.

प्रश्न: धनंजय मुंडेंवर नेमका आरोप काय आहे?

उत्तर: कृषी मंत्री असताना सुमारे 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

12 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

12 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

12 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

15 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

16 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

16 तास ago