मुंबई: ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तसेच तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर हे मान्यवर उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी संगणक सुविधांसह सुसज्ज अशी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्यात येत आहेत. ही केंद्रे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची तपासणी, समुपदेशन आणि मार्गदर्शन याबाबत मदत करतील.
प्रत्येक जिल्ह्यातील दोन नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ कार्यान्वित केली जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक सहाय्यता देणे, तसेच विविध शंका निरसन करणे ही केंद्रांची प्रमुख भूमिका असेल.शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू होणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मदत होईल असेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…