मुंबई: संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) स्थापनेच्या मागणीला पुन्हा गती मिळाली आहे. यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची मुंबईत भेट घेऊन संगमनेर, अकोले आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नव्या शासन निकषांनुसार स्वतंत्र RTO कार्यालयास मंजुरी देण्याची मागणी केली.
परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. नव्या शासन अध्यादेशातील निकषांनुसार संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असून वाहन नोंदणी, परवाने, कर भरणा आणि इतर परिवहन सेवांसाठी संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांना दूरच्या RTO कार्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होत असल्याने स्वतंत्र कार्यालयाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी या मागणीसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मार्च २०२५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही ही मागणी करण्यात आली होती. त्यावेळी स्वतंत्र RTO ऐवजी कॅम्प कार्यालय मंजूर झाले होते. तसेच जुलै २०२५ च्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी विधान परिषदेत हा मुद्दा प्रभावीपणे उपस्थित केला होता.
तांबे यांनी सांगितले की, संगमनेर आणि परिसरातील लाखो नागरिकांना अधिक सुलभ व कार्यक्षम परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार आहे.
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…