मुख्य बातम्या

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गावठी पिस्तुलांसह पंधरा जिवंत काडतुसे जप्त

यवत (प्रतिनिधी) अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करण्याच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि यवत पोलिसांनी संयुक्तरीत्या भांडगाव गावच्या हद्दीत सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन अवैध गावठी पिस्तुले, पंधरा जिवंत काडतुसे आणि बलेनो कार असा एकूण ५ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

खात्रीलायक सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करणारे, तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींबाबत विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पुणे ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला योग्य मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या.

या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैधरीत्या अग्निशस्त्रे बाळगणारे, गावठी पिस्तुलांची खरेदी-विक्री करणारे, तसेच अशा शस्त्रांचा वापर करून गुन्हे करण्याची शक्यता असलेल्या आरोपींबाबत माहिती गोळा करत होते. दरम्यान, ७ जुलै २०२६ रोजी यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडगाव परिसरात सोनाक्षी मंगल कार्यालयासमोरील भागात एक नंबर नसलेली पांढऱ्या रंगाची बलेनो कार संशयास्पदरीत्या उभी असल्याची माहिती मिळाली. त्या कारमध्ये असलेल्या तीन इसमांकडे अवैध गावठी पिस्तुले असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर कारवाईचे आदेश मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांच्या पथकाने तात्काळ सापळा रचला.

त्यानंतर पोलिसांनी संशयित बलेनो कार थांबवून कारमधील तिघांची चौकशी केली. पंचांना बोलावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून तीन गावठी पिस्तुले आणि पंधरा जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली बलेनो कारही पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ७७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी मंगेश शंकर मासाळे (वय २४) सुरज संजय शेलार (वय २६) आणि रोहित प्रेमदास भुजवणे (वय २४) सर्व (रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) या तिघांना यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी सदरची अवैध गावठी पिस्तुले कुठून आणली, ती कोणाला देण्यासाठी आणली होती का, तसेच ही शस्त्रे बाळगण्यामागे नेमका कोणता हेतू होता, याबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक महेश ढोरे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जायभाय, राजू मोमीन, विकास पाटील, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, योगेश नागरगोजे, विकास कांबरे तसेच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप देवकर, धीरज जाधव, मोहन भानवसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

10 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

14 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

14 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

14 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

14 तास ago