महाराष्ट्र

महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले; सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून समृद्धी महामार्गासह राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. समृद्धी महामार्गात २० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हा पैसा राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापरल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.

ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकराव चौधरी यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

मुंबई आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसात शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, उघड्या मॅनहोलमध्ये पडून नागरिकाचा मृत्यू तसेच इतर घटनांमध्ये १२ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करत त्यांनी या दुर्घटनांसाठी सरकारच्या भ्रष्ट आणि निष्काळजी कारभाराला जबाबदार धरले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याचे सांगून सरकारने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली, मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नाही. काँग्रेसचे आंदोलन रोखण्यासाठी सरकारने अफवा पसरवल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर “सर्वात खोटारडे व्यक्ती” असल्याचा आरोप करत वेगळा विदर्भ, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, तसेच लाडकी बहीण योजनेत २,५०० रुपये देण्याच्या आश्वासनांवरूनही सरकारवर निशाणा साधला.

शरद पवार यांच्या पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सपकाळ म्हणाले की, अशा चर्चांची माहिती त्यांच्याकडे नाही. मात्र, भाजपाविरोधात लढणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येणे ही काँग्रेसची भूमिका असून देशात भाजपाला सक्षम पर्याय म्हणून काँग्रेसच उभी राहू शकते, असा दावा त्यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

9 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

9 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

13 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

13 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

13 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

13 तास ago