महाराष्ट्र

गुवाहाटीतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला सुनेत्रा पवारांची भेट; ईशान्येत पक्षबांधणीवर भर

गुवाहाटी: आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त गुवाहाटी दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी गुवाहाटी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली.

गुवाहाटी येथे आगमनानंतर सुनेत्रा पवार यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैचारिक वारशातील महत्त्वाचे नेते दिवंगत Sharatchandra Sinha यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी राज्यसभा खासदार Parth Pawar, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष धीरज शर्मा, ईशान्य समन्वयक संजय प्रजापती, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डी. डी., आसाम प्रदेशाध्यक्ष अजित हजारिका, कार्याध्यक्ष महेंद्र भुयान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष अनुपाल दास आणि राष्ट्रीय सचिव विष्णू प्रसाद दास यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

पक्ष कार्यालयात झालेल्या संवादादरम्यान सुनेत्रा पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांशी संवाद साधत संघटन बळकटीवर भर दिला. त्यांनी पक्षाचा विचार आणि संघटनात्मक वारसा देशभर पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी खासदार पार्थ पवार यांनी युवक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक विषयांवर चर्चा केली. ईशान्य भारतासह आसाममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व अधिक मजबूत करण्यासाठी पक्ष कार्यरत असून आगामी निवडणुकांमध्ये पक्ष महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

7 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

9 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

9 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

9 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

9 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

9 तास ago