devendra fadnavis
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सात वर्षाच्या मुलांच्या आधारकार्डवर चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता हे आधार कार्ड चर्चेत आले आहे.
चंद्रपुरातील जिगल सावसाकडे हा सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा या गावातील रहिवासी आहे. त्याचा जन्म त्याच्या आजोळी म्हणजे चिमूर तालुक्यातील शिवरा या गावात झाला. त्याच्या आईने गावाजवळ असलेल्या शंकरपूर येथे त्याचे आधार कार्ड काढले. मात्र, हे आधार कार्ड जेव्हा घरी आले तेव्हा त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता. यानंतर जिगलच्या कुटुंबियांनी हा फोटो बदलून घेण्यासाठी आधार केंद्र गाठले. मात्र, हे उघडकीस येताच प्रशासनाने आपली चूक दुरुस्त केली. सोबतच ही गंभीर चूक करणाऱ्या एजन्सी बाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितलं आहे.
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने याबाबत हास्यास्पद कारण दिले आहे. चिमूरच्या तहसीलदारांनी सांगितल्या की, जिगल सावसाकडे या मुलाचा फोटो काढताना त्याच्या मागे फडणवीस यांचे पोस्टर होते आणि फोटो काढताना मुलगा हलल्याने चुकून फडणवीस यांचा फोटो आधार कार्डवर आला. मात्र, यावर प्रशासनाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे हे प्रकरण उघडकीस येताच प्रशासनाने तातडीने जिगल सावसाकडे असलेल्या आधार कार्डमध्ये बदल करून त्याचा फोटो लावला आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…