महाराष्ट्र

मणिपूरचे अमानवी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा

मुंबई: मणिपूरमध्ये महिला अत्याचाराच्या अत्यंत घृणास्पद घटना उघड झाल्या असून या घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या घटनांकडे बघ्याची भूमिका घेतली असून अशा निष्क्रिय केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाचा ठराव सभागृहात मांडला जावा आणि मणिपूर घटनेवर चर्चा घडून आणली जावी अशी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे चर्चा मागितली होती. विधानसभा अध्यक्षांनी चर्चा नाकारल्याने काँग्रेसह विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.

“मणिपूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून देशभरातून या घटनेचा धिक्कार करण्यात येत आहे. या घटनेवर विधानसभेत ठराव करुन पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे व सरकारचा धिक्कार झाला पाहिजे अशी विरोधकांची मागणी होती. काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी चर्चा घेण्याची मागणी लावून धरली परंतु विधानसभा अध्यक्षांनी बोलण्याची संधी दिली नाही. अध्यक्षांनी म्हणणेच ऐकून घेतले नाही त्यामुळे सरकारचा निषेध करुन सभात्याग केला”, अशी माहिती माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर केंद्र व मणिपूरमधील भाजपा सरकारचा धिक्कार करत विधानसभेच्या पायऱ्यांवर सकाळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी आंदोलन केले. यावेळी भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला व केंद्र व मणिपूर सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. मणिपूरच्या घटनेचा निषेध करत मणिपूरचे अमानवी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा ठराव काँग्रेस विधिमंडळ पक्षाने केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून…

11 मिनिटे ago

‘सिद्धिविनायक चोरीप्रकरणी मला माहिती नाही’; बांकीपूर पराभवानंतर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावरून केंद्र…

25 मिनिटे ago

खड्ड्याने घेतला टीडीआरएफ जवानाचा जीव! अनेकांचे प्राण वाचवणारा विकास गोरे काळाच्या पडद्याआड

अपघातानंतरच खड्डा बुजवला; पत्नीचा हृदयद्रावक आक्रोश, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी ठाणे : संकटाच्या…

30 मिनिटे ago

पेट्रोल-डिझेल निर्यात महागली! केंद्राचा मोठा निर्णय; ATF वरही शुल्कवाढ

पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ; 3 ऑगस्टपासून नवे दर लागू, सर्वसामान्यांवरील किरकोळ…

2 तास ago

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! श्रीकांत शिंदेंविरोधात लढलेल्या वैशाली दरेकर-राणेंचा राजीनामा

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून…

2 तास ago

‘सावजी’वरून तुकाराम मुंढे वादाच्या भोवऱ्यात; माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा; सावजी समाजाचा इशारा

मुंढेंच्या वक्तव्याने नागपुरात संताप; आहारतज्ज्ञांनीही तेलाचे प्रमाण कमी ठेवण्याचा दिला सल्ला मुंबई: अन्न व औषध…

2 तास ago