एसटीची केलेली दरवाढ मागे घ्या, ही गरीब जनतेची लूट
नागपूर: एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला , कामगारांसाठी एसटी असताना त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे एसटी दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपूर इथे पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की एसटी मध्ये भ्रष्टाचार होत आहे, बस खरेदीचे कंत्राट आता सरकारने रद्द केले. एसटी महामंडळात होणाऱ्या भ्रष्टाचाराला सरकार खतपाणी घालत आहे, ह्यात एसटीचा तोटा होत नाही का? याचा भार गोरगरीब , सामान्य जनतेवर सरकार का लादत आहे , असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. एसटी दरवाढ ही गरिबांची लूट आहे , म्हणून ही दरवाढ मागे घ्यावी अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. यावेळी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवले पाहिजे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० हजार जागा या ओबीसींच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, असे झाले तर ओबीसी समाज हे सहन करणार नाही असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला.
बीड मधील संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराड याच्या एका मागून एक प्रॉपर्टी समोर येताना इडी, सीबीआय तपास का करत नाही. कराडची प्रॉपर्टी जप्त केली तर त्याचा आका जो मंत्री आहे त्याची प्रॉपर्टी जप्त होईल ,सरकारची अशी काय मर्जी कराड वर आहे, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …