शिरूर तालुका

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना स्वच्छ्ता किट भेट

हळदी – कुंकू कार्यक्रमात स्वच्छतेचा संदेश

शिरूर (अरूणकुमार मोटे): संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत महिला हळदी कुंकू कार्यक्रम साजरे करत असतात.यानिमित्त अनेक वेगवेगळे वान दिले जाते.तर्डोबाची वाडी येथे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने समता नगर येथील भिल्ल समाजातील महिलांसोबत हळदी कुंकू कार्यक्रम साजरे केले. यावेळी वान म्हणून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वछता खूप महत्वाची असते यासाठी महीलांना स्वछता किट देण्यात आले.त्यामध्ये सेनेटरी पॅड,मास्क, कोलगेट,ब्रश, डेटॉल, बेंडेज,डेटॉल साबण अशा वस्तू देण्यात आल्या.

स्वच्छतेचा संदेश यावेळी दिल्या मुळे खऱ्या अर्थाने ते वान ठरले. संक्रांती नंतर महिला महिनाभर हळदी कुंकू करण्यात व्यस्त असतात. वंचित घटकातील महिला मात्र अशा कार्यक्रमापासून लांबच राहतात . फारसे कोणी यांना सामावून घेताना दिसत नाही.त्यामुळे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा – राणी कर्डिले यांनी समता नगर येथील भिल्ल समाजातील महिलांसोबत हळदी कुंकू साजरे केले. यानंतर त्यांना स्वच्छ्ता महत्व सांगितले. तसेच कोणतेही व्यसन करू नये.त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.तसेच मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवण्याचे आवाहन राणी कर्डिले यांनी केले.यावेळी सागर आव्हाड यांनी सहकार्य केले. यावेळी गीता आढाव,ललिता पोळ,मोनिका जाधव, सुवर्णा चीपाडे अनेक महिला मान्यवर उपस्थित होते. संस्थेचा वतीने राणी कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

4 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago