महाराष्ट्र

काल ऑफर अन् आज भेट! उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास चर्चा

मुंबई: सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग होताना देखील दिसत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे.विधान परिषदेचे सभापती राम कदम यांच्या दालनामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. अर्धा तास झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळ संपत आला आहे. विधीमंडळामध्ये काल (दि.16) दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले. टीका अन् टोमणे मारल्याचे देखील दिसले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेमध्ये सामील होण्याची ऑफर देखील दिली. थेट सभागृहामध्ये दिलेल्या या ऑफरमुळे चर्चांना उधाण आले. फडणवीसांच्या टीकांना उद्धव ठाकरेंनी सभागृहातच उत्तर दिले. यानंतर आता दोन्ही नेत्यांमध्ये खास भेट झाली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘हिंदीची सक्ती हवीच कशाला’ हे पुस्कत देखील भेट दिलं आहे. त्याचबरोबर हे पुस्तक डॉक्टर नरेंद्र जाधव यांना देखील द्यावे असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढली. महायुती सरकारकडून हिंदी भाषा सक्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधू दोन दशकांनंतर एकत्र आले. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये मराठी भाषा आणि हिंदी भाषा सक्ती यावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या

विधीमंडळाच्या आवारामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अंबादास दानवे यांच्या कार्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. जनसुरक्षा विधेयकाबाबतीत महाविकास आघाडी राज्यपालांची भेट घेण्याचे नियोजन करत असून, याबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. राज व उद्धव ठाकरे हे मराठी भाषेसाठी आणि अस्मितेसाठी एकत्र येत त्यांनी विजयी सभा घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा रंगलेली दिसून आली. मुंबई पालिका राखण्यासाठी दोन्ही बंधू हे निवडणुकीच्या दृष्टीने एकत्रित येऊन युती करण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी राज ठाकरे हे सावधगिरीची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

7 तास ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

19 तास ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

20 तास ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

1 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

1 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

1 दिवस ago