मुंबई: राज्यातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ साठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, ज्या विद्यार्थ्यांना विशेष फेरी-१ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटप झाले आहे, त्यांनी संबंधित महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा. तसेच ऑनलाइन पोर्टलवरील ‘Proceed for Admission’ या पर्यायाचा वापर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९,६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.सुधारित वेळापत्रकानुसार, ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून, १० जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रियेतील सर्व कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…