मुंबई: मुंबईतील मलबार हिल परिसरातील अतिसुरक्षित राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून मृत्यू ओढवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राजभवन परिसरासह पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत जवानाचे नाव कौस्तुभ सांगळे असून ते एसआरपीएफ ग्रुप 16, कोल्हापूर येथील तुकडीचे पोलीस अंमलदार होते. सध्या त्यांची नियुक्ती मुंबईतील राजभवनाच्या सुरक्षेसाठी करण्यात आली होती. ते राजभवन परिसरातील लोक भवन येथे गार्ड ड्युटीवर असताना ही घटना घडली.ड्युटीदरम्यान त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून इतर सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धावले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पथक राजभवनात दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे.या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून मृत्यूमागील कारणांचा शोध घेत आहेत. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कारणाबाबत निष्कर्ष काढलेला नाही.
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…