महाराष्ट्र

सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रियेची माहिती त्यांच्या मातृभाषेत समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करावेत

पुणे: तिसरे विश्व मराठी संमेलन २०२५ उत्साहात सुरु असून, आज दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कायदा व महिलांना मराठी भाषेत न्याय या विषयावर दोन विशेष परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. अनुराधा परदेशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. या परिसंवादात महिला सक्षमीकरण कायद्याची अंमलबजावणी आणि न्यायप्रक्रिया सुधारणा यावर सखोल चर्चा झाली.

स्त्रियांवरील अन्याय रोखण्यासाठी न्यायव्यवस्थेचा सुलभ वापर गरजेचा; डॉ. नीलम गोऱ्हे

यावेळी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “न्याय मिळवण्यासाठी स्त्रियांना मोठा संघर्ष करावा लागतो. कोर्टाच्या पायऱ्या चढताना वकील, न्यायाधीश, कायदेतज्ज्ञ यांची मदत मिळत असली तरी न्यायप्रक्रिया सामान्य नागरिकांसाठी अधिक सुलभ करणे गरजेचे आहे. विशेषतः मराठी भाषेत कायद्याची प्रक्रिया सोपी करण्याची तातडीची गरज आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “स्त्रियांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसा, लैंगिक शोषण यासंदर्भात न्यायालयात तक्रार नोंदवणे सोपे व्हावे यासाठी कायदेशीर शब्दांकन हे सरळ, स्पष्ट आणि मराठीत असावे. अनेक वेळा पीडित महिलांना पोलीस ठाण्यात जबाब नोंदवताना अडचणी येतात, कारण कायदेशीर कागदपत्रे क्लिष्ट आणि इंग्रजीत असतात. त्यामुळे न्यायालयीन निर्णयांची अधिकृत भाषांतरे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.”

अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा हवी; कायदेतज्ज्ञ ॲड. उज्वल निकम

ज्येष्ठ कायदे तज्ञ ॲड. उज्वल निकम यांनी महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांवर भाष्य करताना पोलिसांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, अनेक वेळा पीडित महिलांना पोलीस ठाण्यात जावेसे वाटत नाही, कारण त्यांना वाटते की त्यांचीच चूक आहे. समाजातील मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे. तसेच, पोलीस जबाब घेताना पीडितेची मानसिक स्थिती समजून घेतली पाहिजे आणि तिच्यावर अनावश्यक दबाव येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यांनी मराठी भाषेत न्यायालयीन प्रक्रिया सोपी करण्याची गरजही अधोरेखित केली. तसेच, “महिलांनी योग्य मार्गाने न्याय मिळवण्यासाठी पुढे आले पाहिजे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अधिक संवेदनशीलता दाखवली पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठी भाषेतील कायदे समजण्यास सोपे करण्याची मागणी

परिसंवादादरम्यान, मराठीतून कायद्याची माहिती अधिक सहजसोप्या भाषेत उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले. न्यायव्यवस्थेतील अधिकृत भाषांतर यंत्रणा सक्षम करणे, अधिकृत मराठी अनुवादकांची संख्या वाढवणे, तसेच पोलीस ठाण्यात व न्यायालयात मराठीतून कामकाज करण्यावर भर द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

पुढे बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुचवले की, महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेतील न्यायव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष धोरण तयार करावे. न्यायालयीन निर्णयांची मराठीत अधिकृत भाषांतरे लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत आणि सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रियेची माहिती त्यांच्या मातृभाषेत समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करावेत. या परिसंवादामुळे मराठी भाषेतील न्यायसंस्थेच्या सक्षमीकरणाचा मुद्दा अधिक चर्चेत आला असून, पुढील काळात यावर ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

4 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

4 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

4 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

4 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

4 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

4 तास ago