महाराष्ट्र

एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला अन्…

पुणे: पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते.

खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी धाड टाकून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यातील काही जण उच्चभ्रू वर्गातील असल्याची माहिती आहे. पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाचा समावेश होता, अशी माहिती समोर आली. प्रांजल खेवलकर असे त्यांचे नाव आहे

हे होणारच होतं हे मला माहीत आहे- खडसे

दरम्यान जावई रंगेहाथ सापडताच गिरीश महाजन यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजन जावयाच्या संदर्भात विचारणा केली असता एकनाथ खडसे म्हणाले की, यासंदर्भातील मला माहिती तुमच्याकडूनच पहिल्यांदा भेटत आहे आणि हे होणारच होतं हे मला माहीत आहे. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला. मात्र, यामध्ये राजकीय कारवाईचा वास येत आहे का? अशी विचारणा केली असता खडसे यांनी शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले.

षड्यंत्र असल्यास समोर आले पाहिजे

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी स्थानिक पोलीस अजिबात तपास करणार नाहीत. त्यांच्यावर दबाव असू शकत. जो दोष असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे असे सुद्धा खडसे यांनी म्हटलं आहे. मात्र मला या कारवाई संदर्भात अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही. मला पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी स्पष्ट बोलणाऱ्यांपैकी असल्याने त्यावेळी बोलेन असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून विरोधात बोलत आहे त्यांना अडकवण्याची मालिका सुरू आहे. त्यामुळे मी कोणाच्याही बाजूला राहणार नाही. यामध्ये षड्यंत्र असल्यास समोर आले पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी बोलताना केली.

प्रांजल खेलवलकरांची आलिशान सोनाटा लिमोझिन कारवरून चर्चेत

राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेलवलकर या पूर्वीही एका कारणासाठी चर्चेत आले होते. यात खेलवलकरांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान कार वादात सापडली होती. या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप करत ती कार जप्त करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करत अनेक आरोप केले होते

अंजली दमानिया यांनी खडसेंच्या जावयाच्या लिमोझिन कारचा मुद्दा उपस्थित करत खडसे यांचे जावई प्रांजल खेलवलकर यांची एमएच 19 एक्यू 7800 ही सोनाटा लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा केला होता. जळगाव आरटीओमध्ये या गाडीची नोंदणी झाली असून, सदर गाडीला पासिंग मिळाले आहे. मात्र, या आलिशान गाडीची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. हलक्या वाहनांच्या (एलएमव्ही) श्रेणीत या कारची नोंदणी करण्यात आली होती. शिवाय, अॅम्बेसिडर लिमोझिन कारव्यतिरिक्त अन्य लिमोझिन कारना देशात परवानगी नसल्याचा दावाही दमानिया यांनी केला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

5 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 आठवडा ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

1 आठवडा ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

1 आठवडा ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

1 आठवडा ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

1 आठवडा ago