महाराष्ट्र

शिवसेनेच्या बॅनरवरुन एकनाथ शिंदेचा फोटो गायब, फक्त त्यांचाच भगव्या शालीतला एकच मोठा फोटो

मुंबई: काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आमदार निवासातील कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सध्या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी बुलढाण्यातील चिखली येथे होत असलेल्या शिंदे गटाचा संवाद मेळाव्यातील एक बॅनर कारणीभूत ठरला आहे. या बॅनरवर संजय गायकवाड यांचा स्वत:चा भगवी शाल परिधान केलेला आणि त्यांच्या मुलाचा फोटो आहे. या दोघांशिवाय बॅनरवर कोणालाही स्थान देण्यात आलेले नाही. शिवसेनेचे प्रेरणास्थान असलेले बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनाही या बॅनरवर स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात संजय गायकवाड यांच्या नाराजीची जोरदार चर्चा रंगली आहे.

संजय गायकवाड यांची एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जिल्हा संघटकपदी पक्षाने नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी रविवारी चिखली शहरात पहिल्यांदाच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला होता. या संवाद मेळाव्यात स्टेजवरील बॅनरवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो लावण्यात आला होता. बॅनरवर ना पक्षाचे नाव, ना पक्षाच चिन्ह…. इतकंच काय तर बाळासाहेबांचा किंवा एकनाथ शिंदे यांचाही फोटो नव्हता तर शिवसेना हे नाव सुद्धा बॅनरवर नसल्याने संजय गायकवाड हे नाराज तर नाहीत ना…? कारण पक्षाच्या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांचे फोटो, पक्षाचे नाव व चिन्ह हे बॅनरवर असावं असा नियमच आहे. मात्र, कालच्या या मेळाव्यातील बॅनर मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून संजय गायकवाड हे नाराज तर नाहीत ना, याबाबत आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी सरळ उत्तर देण्याचे टाळले. एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे हे आमच्या काळजातच आहेत, असे उत्तर देत गायकवाड यांनी वेळ मारुन नेली.

महापालिका निवडणूक तोंडावर असताना वर्ष झालं तरीही शिंदे गटाकडून मुंबईच्या कार्यकारणीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या मुंबईतील शिंदे गटाचे पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईत पदाधिकाऱ्यांची कुठलीही बैठक पार पडलेली नाही. जुनी कार्यकरणी रद्द करून नवीन कार्यकरणीसाठी मुलाखती होऊन आणि अहवाल देऊन आठ महिने उलटले आहेत. मात्र, तरीही नवीन कार्यकारिणीची अद्याप घोषणाच झाली नसून पक्षातील एकूणच कार्यपद्धतीवर पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे.

माजी नगरसेवकांच्या बैठकीत कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या, तरी पदाधिकारी पक्षाकडून मिळणाऱ्या पदाकडे लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील नेत्यांवरही अद्याप कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. कुठल्याही उत्सवाच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांच्यानंतर कुटुंबियांचेच फोटो प्रामुख्याने दिसतात, अशी खंत पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असताना, शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र पालिका निवडणुकीचा संथ कारभार सुरू असल्याची कुजबुज पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात रंगली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

1 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

2 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

2 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

2 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

2 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

5 तास ago