महाराष्ट्र

पुणे महापालिका निवडणूक मतमोजणीसाठी जय्यत तयारी; अंतिम निकाल रात्री उशिरा येण्याची शक्यता

पुणे: पुणे महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अधिकृत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत बहुतांश प्रभागांचे निकाल जाहीर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला, तरी अंतिम प्रभागाचा निकाल रात्री १० वाजेपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील १५ मतमोजणी केंद्रांवर ३३५ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी ३८ टेबल टपाली मतदानासाठी तर २९७ टेबल ईव्हीएम मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत. चार-सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अनेक प्रभागांत उमेदवारांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक प्रभागासाठी ४ ते १२ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. एका फेरीसाठी सरासरी ३५ ते ४५ मिनिटे लागणार आहेत.

प्रशासनाने एका वेळी एका प्रभागाचीच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित प्रभागाचा पूर्ण निकाल लागल्यानंतरच पुढील प्रभागाची मतमोजणी सुरू केली जाणार आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

सर्व मतमोजणी केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही देखरेख आणि प्रवेश नियंत्रण व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर कर्मचारी, निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. गर्दी व कायदा-सुव्यवस्था लक्षात घेता वाहतूक नियंत्रण आणि जमावबंदीचा विशेष आराखडा राबवण्यात येणार आहे.

आकडेवारी

एकूण प्रभाग : ४१

जागा : १६५

उमेदवार : १,१५५

टपाली मतदानासाठी वितरित मतपत्रिका : १२,०००

आतापर्यंत झालेले टपाली मतदान : २,८८९

प्रशासनाचा दावा

अतिरिक्त आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले की,“मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्या दोन तासांत पहिला निकाल येण्याची शक्यता आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असून, उमेदवार संख्या जास्त असलेल्या प्रभागांसाठी अतिरिक्त नियोजन करण्यात आले आहे.”प्रशासनाचा प्रयत्न दुपारपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट करण्याचा असला, तरी पुणे महापालिकेचे अंतिम सत्ता समीकरण रात्री उशिराच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

16 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago