महाराष्ट्र

सक्षम महिला, सुदृढ बालक आणि कुपोषणमुक्त राज्य करणार; अदिती तटकरे

मुंबई: राज्य कुपोषण मुक्त तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करणार असल्याची ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान महिलांवरील वाढत्या अत्याचारा संदर्भात महाराष्ट्र पोलीस, महिला आयोग तसेच बालहक्क आयोग, विधी व न्याय विभागाची मदत घेऊन प्राधान्याने काम केले जाईल असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तातडीने कामाला सुरूवात केली. महाराष्ट्रातील बालमृत्यू, बालविवाह, कुपोषण या समस्यांच्या निर्मूलनाबरोबरच महिलांमध्ये उद्योजकता विकसित करण्याचे काम करणार आहे. महिला व बालविकास, ICDS, बालहक्क समिती, महिला आयोग, राजमाता जिजाऊ मिशन, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महिला व बालविकास खाते महिला व बालकांच्या सर्वांगिण विकासाचे काम करत आहे. प्रत्येक महिलेला योग्य शिक्षण, काम, पोषणासंदर्भातली माहिती, बालकांच्या विकासात पुरुषांचा सहभाग, अशा विविध मार्गांतून हा विभाग यापुढे काम करेल असा विश्वासही अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

अंगणवाडी सेविका या महिला व बालविकास विभागाच्या राजदूत आहेत. या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बचत गट तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयातून राज्याला एक आदर्श वाटेल अशी व्यवस्था आपण निर्माण करू. पोषण अभियानात संपूर्ण देशात राज्याने सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. यंदा ही महाराष्ट्राची कामगिरी अशीच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितले.

महिला व बालविकास विभाग या अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विभागाची जबाबदारी पार पाडण्यासाठी निवड केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेसाहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचे अदिती तटकरे यांनी आभार मानले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

44 मिनिटे ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

1 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

3 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

22 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

22 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

22 तास ago