महाराष्ट्र

राज्याच्या विकासाची स्वप्न पहात राज्याला प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीने नवीन टीम काम करणार

मुंबई: आम्ही सामुदायिकपणे काम करायचे ठरवले असून अजितदादांचा अर्थखात्याचा प्रदिर्घ अनुभव लक्षात घेता काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित निर्णय घेतल्याने खातेवाटप झाले आहे. राज्याच्या विकासाची स्वप्न पहात राज्याला प्रगतीपथावर नेण्याच्यादृष्टीने नवीन टीम काम करणार आहे, असा विश्वास व्यक्त करतानाच या नवीन टीमला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

तीन पक्षाचे सरकार असते त्यावेळी सगळ्या बाबी असतात. महत्त्वाची व जनतेच्या सेवेच्यादृष्टीने असलेली खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मिळाली आहेत त्याबद्दल आम्ही समाधानी आहेच शिवाय हे सर्व मंत्री मिळालेल्या खात्याचा कारभार उत्तमरित्या करतील असा विश्वासही सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

सध्या आमच्या सर्व आमदारांसोबत माझ्या बैठका व गाठीभेटी होत आहेत. अधिवेशन काळातही यासंदर्भात बैठका होतील तो निर्णय विधीमंडळ नेते अजितदादा पवार घेतील असेही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

3 तास ago

Video! नगर-पुणे महामार्गावर धावत्या कंटेनरच्या टायरला आग; टाकीजवळच भडका…

कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…

7 तास ago

शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात…

9 तास ago

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

2 दिवस ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

3 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 दिवस ago