महाराष्ट्र

एसटी प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्डची मुदत वाढली; आता १ सप्टेंबरपर्यंत मिळणार अतिरिक्त वेळ

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ दिली आहे. पूर्वी १ ऑगस्टपर्यंत असलेली अंतिम मुदत आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आणखी एक महिन्याचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे.

या योजनांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

महिला सन्मान योजना – महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत.

विद्यार्थी पास योजना – शालेय विद्यार्थ्यांना ६६.६७ टक्के सवलतीसह मासिक पास.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना – इयत्ता १२ वीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास.

ज्येष्ठ नागरिक सवलत – ६५ ते ७५ वर्षे वयोगटासाठी ५० टक्के सवलत.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना – ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी एसटी प्रवास पूर्णपणे मोफत.

स्मार्ट कार्ड कसे मिळेल?

महिला व ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड आधार कार्डशी जोडले जाईल.

विद्यार्थ्यांचे कार्ड SARAL क्रमांकाशी लिंक केले जाईल.

दिव्यांग नागरिकांचे कार्ड UDID क्रमांकाशी जोडले जाईल.

स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि राज्य पुरस्कार विजेत्यांना विभागीय मुख्यालयातून कार्ड उपलब्ध होईल.

महत्त्वाचे नियम

अधिकृत केंद्रावर जाऊन स्मार्ट कार्ड काढता येईल.

सवलतीच्या तिकिटांची रक्कम थेट कार्डच्या वॉलेटमधून वजा होईल.

कार्डमध्ये रोख रक्कम किंवा UPI द्वारे रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

एसटी महामंडळाने सर्व पात्र लाभार्थ्यांना १ सप्टेंबरपूर्वी NCMC स्मार्ट कार्ड काढून सवलतींचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

14 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago