महाराष्ट्र

दौंडमध्ये ७ ते ८ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने खळबळ

मुंबई: पुणे जिल्ह्यातील दौंड येथील गोपाळवाडी परिसरात एक मृत अर्भक आणि सात ते आठ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूणहत्येच्या संभाव्य प्रकरणांकडे लक्ष वेधले असून, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ही घटना अत्यंत गंभीर असून, त्यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. सात ते आठ अर्भकांचे अवयव एका बाटलीत सापडणे हे केवळ अपघाताने घडलेली घटना नसून, एका मोठ्या बेकायदेशीर गर्भपात साखळीचा भाग असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, दौंड परिसरातील खासगी दवाखाने, प्रसुतीगृहे, वैद्यकीय व्यावसायिक आणि दलालांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन झाल्याचा संशय या घटनेतून व्यक्त केला जात आहे. सोनोग्राफी केंद्रे आणि खासगी दवाखान्यांची सखोल तपासणी करून कोणत्याही स्वरूपात लिंगनिदान आणि त्यानंतर गर्भपात केले जात असल्यास, त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करावी. तसेच, सापडलेल्या अर्भकांचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करून त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याची शास्त्रीय तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा द्यावी. दौंड परिसरातील अनधिकृत गर्भपात केंद्रांवर छापे टाकून कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच, महिला आणि बालविकास विभागाने या प्रकरणावर विशेष लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले आहे.

ही घटना सामाजिकदृष्ट्या आणि कायद्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, दोषींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात केलेली कार्यवाही तत्काळ त्यांच्या कार्यालयास कळवावी, असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य संचालकांना दिले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago