आरोग्य

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची कमतरता झाली तर अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. सूर्यप्रकाशात कमीत कमी वेळ घालवल्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांवर परिणाम होतो. लहान मुलांत याचा अधिक धोका असतो. कारण ती उन्हात जास्त वेळ नसतात.

व्हिटॅमिन-डी महत्वाचे का आहे

व्हिटॅमिन-डी कॅल्शियमचे योग्य प्रमाण राखण्यास मदत करते. ज्यामुळे रक्त आणि हाडात कॅल्शियमची कमतरता टाळता येते आणि हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन-डी शिवाय, शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या देखील उद्भवते. यामुळे हायपोपॅराथायरॉईडीझमची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे नैराश्य, क्रॅम्प, थकवा इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. मुलांत कॅल्शियमची कमतरता झाली तर शरीर हाडांमधून कॅल्शियम घेण्यास सुरुवात करते. ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. याशिवाय वाढीस अडथळा निर्माण होऊ शकतो. व्हिटॅमिन-डी च्या कमतरतेमुळे मुलांच्या मानसिक विकासातही समस्या उद्भवू शकतात.

मुलांत व्हिटॅमिन-डी ची कमतरता कशी टाळावी

मुलांना दररोज सकाळी काही वेळेसाठी खेळायला पाठवले पाहिजे. ज्यामुळे त्यांच्या त्वचेतून सूर्यप्रकाश शोषून व्हिटॅमिन-डी तयार करू शकेल. खेळत असताना त्यांचा व्यायाम देखील होईल, जे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मशरूम, अंड्यातील पिवळे बल्क, कॉड लिव्हर ऑइल, फॅटी फिश (सॅल्मन, सार्डिन, मॅकरेल इ.) व्हिटॅमिन-डी असलेल्या अशा खाद्यपदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करावा. याशिवाय फोर्टिफाइड खाद्यपदार्थही बाजारात उपलब्ध आहेत, ज्यांचा मुलांच्या आहारात समावेश करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…

8 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…

9 तास ago

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

1 दिवस ago