महाराष्ट्र

विजयस्तंभ अभिवाद सोहळ्यासाठी येणाऱ्यांना सुविधा द्या…

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम आढावा बैठक

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सोहळ्याच्या पूर्वतयारी बाबत विधानभवन येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यभरातून अनुयायी येत असल्याने पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, पाणी पिण्यासाठी कागदी ग्लासची व्यवस्था करावी, अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात याव्यात. लोणीकंद ते डोंगरगाव रस्ता करणे, पुणे नगर रोड या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी साठ लाख रुपये जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येतील तसेच सदर सोहळा शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करत या सोहळ्याच्या नियोजनासाठी आवश्यक सर्व निधी शासनातर्फे देण्यात येईल असे देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

सदर बैठकी दरम्यान बोलताना या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरु करण्यात आली असून विविध पातळ्यांवर बैठका घेण्यात आल्या आहेत. नियोजनाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी देत कोविड नंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता १६ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्या तसेच वाढीव बसेस, १४०० तात्पुरती स्वच्छतागृहे, २० रुग्णवाहिका, आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, अग्निशमन वाहने आदी व्यवस्था करण्यात येत असल्याचे डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. तर या सोहळ्यासाठी पोलीस विभागातर्फे आवश्यक बंदोबस्ताचे व वाहतूक विषयक नियोजन करण्यात येत असल्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

4 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

8 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

8 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago