क्राईम

शिरूर हादरलं! लॉजमध्ये युवतीवर 7 जणांचा आळीपाळीने अत्याचार; पाहा नावे…

शिरूर : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका परप्रांतीय युवतीला (वय २२) लॉजमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित युवती ही मूळची छत्तीसगड येथील रहिवासी असून ती सध्या चाकण परिसरात वास्तव्यास होती. आरोपींनी तिला चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवले आणि चाकण येथून कारमध्ये बसवून शिरूर येथे आणले. 19 ते 21 ऑगस्ट या कालावधीत तिला शिरूरमधील ‘हॉटेल मार्वल इन लॉजिंग’ येथील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. आरोपींनी पीडित युवतीला जबरदस्तीने पांढऱ्या रंगाची नशा आणणारी पावडर दिली. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिला मारहाण केली.

युवतीने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर थेट शिरूर पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली व तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दिपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे, ऋषीकेश ढवळे, दिपक भोसले, सागर ढवळे, अनिकेत पठारे आणि एक अनोळखी व्यक्ती अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे शिरूर तालुका हादरला असून, तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यात घडली धक्कादायक घटना; युवक, युवतीला मारहाण करत केला सामूहिक बलात्कार…

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरूर! अल्पवयीन मुलांचे अपहरण अन् मुलीचा खून करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

1 तास ago

Video! नगर-पुणे महामार्गावर धावत्या कंटेनरच्या टायरला आग; टाकीजवळच भडका…

कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…

6 तास ago

शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात…

8 तास ago

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

2 दिवस ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

3 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 दिवस ago