मुंबई: बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही खरीप हंगामातील पेरणीच्यादृष्टीने समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला असताना मी माझा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी जाहीर भूमिका राज्याचे नवनिर्वाचित कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. त्यांच्या या जाहीर भूमिकेचे स्वागत केले जात आहे. (दि. १५) जुलै रोजी धनंजय मुंडे यांचा वाढदिवस असून तो सार्वजनिकरित्या साजरा करणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी जाहीर केले आहे.
नवनिर्वाचित कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेचे प्रेम, आशिर्वाद व शुभेच्छा सदैव माझ्यासोबत आहेत. परंतु पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवून यावर्षी वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा न करत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत जाहीर केले आहे.
न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…
कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…
शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात…
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…