मुंबई: क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालेले श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर, आदिल सुमारीवाला या मान्यवरांचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार, दिव्यांग बांधवांसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज क्रीडा क्षेत्रातील ११७ मान्यवरांना जाहीर झाले. या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे, दिलेल्या योगदानाचा महाराष्ट्राला अभिमान आहे. या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येने खेळांकडे वळतील, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम राखतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…