भूसंपानाची प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण होणार…
औरंगाबाद-नगर-पुणे महामार्गात जमिनी भुसंपादित शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या चार पट अधिक मोबदला मिळणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. जर रेडी रेकनरचा दर जर पाच लाख रुपये असेल तर भुसंपादित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या मोबदल्यात एकरी 20 लाख रुपय मिळणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून या महामार्गासाठी आवश्यक जिल्ह्यातील भूसंपादनाचे काम सुरू होणार असून भूसंपादन नियमात राहून केला जाणार आहे. शिवाय, औरंगाबाद जिल्ह्यात भूसंपादनासाठी कृष्णा खोऱ्याचे भूसंपादन अधिकारी राजेश जोशी यांची अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
या महामार्गासाठीचे औरंगाबाद जिल्ह्याचे राजपत्रक नुकताच प्रसिद्ध झाल आहे. औरंगाबाद तालुक्यातील सात आणि पैठण तालुक्यातील 17 अशा एकूण 24 गावांची नावे सदर राजपत्रकात नमूद झाली होती. निश्चितच भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असल्याने लवकरच या प्रक्रियेला सुरवात होणार आहे.
२४ गावांतून जाणार रस्ता
औरंगाबाद ते पुणे या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) निघाली असून औरंगाबाद तालुक्यातील ७ तर पैठण तालुक्यातील १७ गावांतून मार्ग जाणार आहे. भारतमाला टप्पा-२ मध्ये ग्रीनफिल्डमध्ये हा मार्ग प्रस्तावित आहे. औरंगाबाद तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रूक, चिंचोली, घारदोन तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रूक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून रस्ता जाणार आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…