महाराष्ट्र

कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज…

नागपूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका अवलंबत आहे. त्यामुळे आता मराठी बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारने खंबीर भूमिका घेतली पाहिजे, कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज आहे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.

आज महाराष्ट्र बेळगाव एकीकरण समितीने आयोजित मोर्च्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात आज उपस्थित केला.

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावाद गेल्या ६१ वर्षापासून प्रलंबित आहे. कर्नाटक सरकारकडून सतत दुटप्पी भूमिकेचा अवलंब केला जात आहे.एकप्रकारे महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधींना अडवलं जातंय हे म्हणजे आपण भारत पाकिस्तान सीमेवर राहतो का असा प्रश्न पडल्याचे दानवे म्हणाले.

बेळगाव कर्नाटक सीमावादातील ८७५ गावांचा प्रश्न हा आजचा नाही, तरी जत, सोलापूर, अक्कलकोट मध्ये कर्नाटक सरकार सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय, यामुळे तेथील मराठी बांधवांमध्ये मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने, विधिमंडळ व सरकारने यासाठी एकत्र आलं पाहिजे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री व तेथील नेते ज्याप्रमाणे एकत्र येऊन आक्रमक भूमिका मांडतात त्याप्रमाणे सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

23 मिनिटे ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

30 मिनिटे ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

2 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

19 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

23 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

23 तास ago