महाराष्ट्र

बदलापूरमध्ये ‘स्त्रीबीज विक्री’ रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिलांना अटक

बदलापूर: बदलापूर पूर्व परिसरात गरीब आणि गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील स्त्रीबीज (अंडी) काढून बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याने तिघींना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात औषधे आणि इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुलक्षणा गाडेकर (४४), अश्विनी चाबुकस्वार (२९) आणि मंजुषा वानखेडे (४७) यांचा समावेश आहे. हे रॅकेट जोवेली परिसरातील ‘नॅनो सिटी’ येथील एका इमारतीतून चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

रॅकेटची कार्यपद्धती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना २५ ते ३० हजार रुपयांचे आमिष दाखवत. त्यानंतर त्यांच्या शरीरात स्त्रीबीज वाढीसाठी हार्मोनल इंजेक्शन्स दिली जात. पुढे वैद्यकीय प्रक्रियेद्वारे स्त्रीबीज काढून त्यांची इतर राज्यांमध्ये बेकायदेशीर विक्री केली जात होती.

या रॅकेटचा विस्तार तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तपासादरम्यान सुमारे आठ लाख रुपयांचा इंजेक्शन व औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.

पुरावे आणि तपास

वैद्यकीय पथकातील डॉ. ज्योत्स्ना सावंत यांना एका पीडित महिलेने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी कारवाई केली. आरोपींच्या मोबाईल फोनमध्ये गर्भधारणेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफी अहवाल, खोट्या नावांची सत्यप्रतिज्ञापत्रे, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे आढळून आले आहेत.

या प्रकरणात २० हून अधिक महिलांचा वापर झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आणखी काही डॉक्टर किंवा रुग्णालयांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. याबाबत उल्हासनगर विभागाचे डीसीपी सचिन गोरे यांनी अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.

कडक कारवाईची मागणी

दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित रुग्णालयांचे परवाने रद्द करणे, दोषींवर कठोर गुन्हे दाखल करणे आणि बीजांड दान व सरोगसी प्रक्रियेवर कडक मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्याची मागणी केली आहे.

जागरूकतेची गरज

या घटनेमुळे महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलण्याबरोबरच महिलांमध्ये जनजागृती करणेही तितकेच आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि संबंधित साखळी उघड करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

18 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

18 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

23 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago