शिरूर तालुका

शिरूर! कारेगाव येथील यश इन चौकात कंटेनर अडकल्याने तासभर वाहतूक ठप्प; पाहा Video

कारेगाव (तेजस फडके) : आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC च्या प्रवेशद्वारापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पुणे-नगर महामार्गावर असलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यात आज (मंगळवार) सकाळी 7 सुमारास कंटेनरचे मागील चाक अडकल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे कंपनीत ये-जा करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना, ट्रान्सपोर्टरांना आणि प्रवाशांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागला.

खड्ड्यात अडकले चाक अन रांगा लागल्या किलोमीटरभर…
औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खोल आणि धोकादायक खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. आज (ता. 24) सकाळी एक मालवाहू कंटेनर रांजणगाव औद्योगिक वसाहतीत (Ranjangaon MIDC) प्रवेश करत असताना त्याचे मागील चाक खोल खड्ड्यात रुतले. वाहन पुढे न सरकल्याने मागून येणारी वाहने थांबली आणि काही मिनिटांतच दोन्ही बाजूंना लांबच लांब रांगा लागल्या.
कामगारांची शिफ्ट बदलण्याची वेळ असल्याने दुचाकी, कार, बसेस आणि मालवाहू गाड्यांची प्रचंड गर्दी झाली. अनेक कर्मचारी वेळेत कंपनीत पोहोचू शकले नाहीत. काही रुग्णवाहिकांनाही मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

नागरिकांचा संताप अन तक्रारींना केराची टोपली…
यावेळी स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी तत्काळ धाव घेत कंटेनर बाहेर काढण्यासाठी मदत केली. काही वेळाने दुसरे वाहन बोलावून कंटेनर हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी करुनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. पावसाळ्यानंतर प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र प्रत्यक्षात कामाचा मागमूसही नाही. औद्योगिक वसाहतीत दररोज हजारो कोटींची उलाढाल होत असताना प्रवेशद्वाराजवळच असा धोकादायक रस्ता असणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.

धोकादायक खड्ड्यामुळे अपघाताची भीती कायम…
या मार्गावरून दररोज अवजड वाहने, रसायन वाहतूक करणारे टँकर, तसेच कामगारांच्या बसेस धावतात. पुणे-नगर महामार्गावरील धोकादायक खड्ड्यांमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे-नगर महामार्गावर असलेले धोकादायक खड्डे संबंधित विभागाने तातडीने त्वरित बुजवावेत तसेच रस्त्याचे संपुर्ण डांबरीकरण करावे. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरती यंत्रणा उभारावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. अन्यथा अशा निष्काळजीपणामुळे एखादा मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काही सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

पुणे ते छ. संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पाच्या कामाला अखेर वेग; खराडी ते शिरूर…

शिरूर तालुक्यात कारची दुचाकीला भीषण धडक; युवकाचा पाय फ्रॅक्चर…

पुणे–नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी गंभीर; राज्य महामार्ग पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप

शिरूर! रस्त्यावरील वाढत चाललेले खड्डे, उखडलेले डांबर; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच बिकट…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago