मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या यांच्या भूमिकेत अभिनेत्री दिसणार आहेत. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना त्यावर आधारित चित्रपट तयार केला जात आहे. तसेच एखाद्या व्यक्तीचे पात्र साकारताना संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक असते, मात्र या चित्रपटासाठी माझी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांविरोधातही कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खरात प्रकरणात आपल्यावर आणि आपल्या कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “माझ्या मुलांनाही लक्ष्य करण्यात आले. ते शैक्षणिक क्षेत्रात असतानाही त्यांच्याविरोधातही निराधार आरोप करण्यात आले,” असे त्या म्हणाल्या.
यासंदर्भात त्यांनी यांना नोटीस पाठविल्याचे सांगितले. तसेच येथे दाखल केलेल्या याचिकेत , , आणि आशा मिरगे यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १० जुलै रोजी त्या स्वतः दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहणार असून, काही यूट्यूब चॅनेल्सविरोधातही न्यायालयीन कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता त्याच प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…
ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…
जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…