महाराष्ट्र

अहिल्यानगरात भरदिवसा गँगवॉर; तरुणावर कोयता-रॉडने जीवघेणा हल्ला, गोळीबाराचीही चर्चा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा झालेल्या गँगवॉरमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. स्थानिकांकडून गोळीबार झाल्याचाही दावा करण्यात येत असून, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णवाद नगर परिसरातील चौकात शुभम यादव (वय १९) हा जात असताना दोन ते तीन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर कोयते आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. गंभीर जखमी झालेला शुभम घटनास्थळीच कोसळला.

भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेवेळी अनेक नागरिक उपस्थित होते, मात्र कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही, अशी माहिती समोर आली आहे.

हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी शुभम यादव याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

7 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

7 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

7 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

7 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

7 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

18 तास ago