महाराष्ट्र

मालवण मधील ‘उबाठा’ च्या चार माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

मुंबई: मालवण नगरपालिकेतील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जिल्हा प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक मंदार केणी, उबाठा गटाचे मालवण पालिकेचे माजी बांधकाम सभापती यतिन खोत आणि माजी नगरसेविका दर्शना कासवकर व सेजल परब यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा हा विकासासाठी कटीबद्ध असून विकसित भारत आणि महाराष्ट्रासाठी योगदान देईल. या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळ सिंधुदूर्ग जिल्ह्यात भाजपा संघटनेला अधिक बळकटी मिळेल. पक्षात प्रवेश केलेल्यांचा यथोचित सन्मान राखला जाईल असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन आम्ही सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे श्री.केणी म्हणाले. निष्ठेने भाजपा वाढीसाठी काम करेन असेही ते म्हणाले.या माजी नगरसेवकांबरोबरच उबाठा शाखा प्रमुख भाई कासवकर, नितीन पवार, संजय कासवकर व सई वाघ, उपशहर प्रमुख नंदा सारंग, उपशहर प्रमुख युवासेना अमन घोडावले, अशोक कासवकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

25 मिनिटे ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

29 मिनिटे ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

33 मिनिटे ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

15 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago