महाराष्ट्र

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. तपासाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही, प्रलंबित बाबी आणि तपास पूर्ण होण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे सविस्तर विचारणा केली.

अजितदादांच्या विमान अपघातामागील सत्य जनतेसमोर यावे, तपासात कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी व्हावी, अशी ठाम भूमिका जय पवार यांनी यावेळी मांडली. या भेटीमुळे अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

‘अजितदादांच्या अपघाताचे सत्य हा लाखो नागरिकांच्या विश्वासाचा विषय’

“अजितदादांच्या विमान अपघातामागील सत्य समोर येणे हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून, दादांवर अपार प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या विश्वासाचा विषय आहे,” असे जय अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

या अपघाताबाबत जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. तपासातील प्रत्येक महत्त्वाच्या बाबीची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणली पाहिजे. त्यासाठी तपास अधिक गतिमान करण्यासह सर्व संबंधित बाबींची गांभीर्याने पडताळणी करण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिरंगाई नको; दोषींना जबाबदार धरण्याची मागणी

विमान अपघाताच्या तपासात कोणतीही दिरंगाई न करता प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करावा. चौकशीतून दोषी आढळणाऱ्यांना जबाबदार धरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी भूमिका जय पवार यांनी मांडली. तपासाची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाहीबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.यावेळी आमदार विक्रम काकडे उपस्थित होते.

‘सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार’

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सत्य समोर येणे आणि जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आणि सत्य समोर येईपर्यंत आपण सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचा ठाम निर्धार जय अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड…

1 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, झिशान सिद्दीकींकडे मुंबईची धुरा

सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक…

3 तास ago

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय…

3 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि…

8 तास ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून ५२० किलो तांब्याच्या तारांची चोरी…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील करडे येथे अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडुन त्यातील तब्बल…

9 तास ago