महाराष्ट्र

१० जुलै ला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर; शीतल करदेकर

मुंबई: पत्रकार हे समाजाचे चतुर्थ स्तंभ मानले जातात. दिवसरात्र मेहनत करून समाजासाठी माहितीचे दालन खुले ठेवणाऱ्या या योद्ध्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे, याच भावनेतून अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन व रोटरी क्लब नॉर्थ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने एक विधायक पाऊल उचलण्यात आले आहे.

गुरुवार, १० जुलै २०२५, रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदानाजवळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदय व रक्तदाब तपासणी , मधुमेह (शुगर) तपासणी ,रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी ,संपूर्ण वैद्यकीय तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला, तपासणीनंतर मोफत औषध वाटप इत्यादी सेवा निःशुल्क  दिल्या जाणार आहेत. या शिबिरात वोखार्ड हॉस्पीटल या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व तज्ज्ञांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या उपक्रमामागे पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य सुरळीत राहावे, हीच भावना आहे. “आरोग्य हेच खरे धन आहे.” या उक्तीला अनुसरून या संधीचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago