जाणून घ्या नवीन नियम
आरटीओ टेस्टला गुडबाय: ड्रायव्हिंग लायसन्ससाठी थेट आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. तुमची टेस्ट मान्यताप्राप्त खाजगी प्रशिक्षण केंद्रांमध्ये होईल.
प्रशिक्षण केंद्रांमध्ये टेस्ट: आता मान्यताप्राप्त खाजगी प्रशिक्षण केंद्रांमध्ये उत्तम ड्रायव्हिंग स्किल्स शिकता येतील आणि त्याच ठिकाणी टेस्टही देता येईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
फक्त https://parivahan.gov.in/संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरा.
ऑफलाइन प्रक्रियेसाठी आरटीओमध्ये जाण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शुल्क
लर्निंग लायसन्स: ₹150
लर्निंग लायसन्स टेस्ट (पुन्हा): ₹50
ड्रायव्हिंग टेस्ट (पुन्हा): ₹300
ड्रायव्हिंग लायसन्स जारी: ₹200
आंतरराष्ट्रीय लायसन्स: ₹1,000
इतर वाहन वर्ग जोडणे: ₹500
लायसन्स रिन्यू: ₹200
लेट रिन्यूवल: ₹300/वर्ष + ₹1,000
नवीन नियमांचे फायदे
वेळेची बचत: आरटीओमधील लांबच लांब रांगा आता नाहीत.
उत्तम प्रशिक्षण: मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रांमुळे सुरक्षित आणि योग्य प्रशिक्षण मिळेल.
पारदर्शक प्रक्रिया: सर्व काही डिजिटल असल्याने प्रक्रिया जलद आणि विश्वासार्ह.
काय करायला हवं
मान्यताप्राप्त खाजगी प्रशिक्षण केंद्र निवडा.
प्रशिक्षणानंतर मिळालेलं प्रमाणपत्र (Certificate) जपून ठेवा.
अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ वापरा: https://parivahan.gov.in/
आजच अर्ज करा
नवीन नियमांमुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं अगदी सोपं, जलद, आणि पारदर्शक झालं आहे. तुमचं लायसन्स मिळवा, सुरक्षितपणे ड्रायव्हिंग करा, आणि रस्त्यांवर जबाबदार नागरिक बना.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…