संभाजीनगर: राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता ग्राहकांना महागड्या वीजबिलांपासून मोठा दिलासा मिळणार असून, लवकरच वीज दरात कपात होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)ने वीज दर कपात करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) सकारात्मक निर्णय दिला आहे.
किती कपात होणार
पहिल्या वर्षी: वीज दरात थेट 10% कपात
पुढील 5 वर्षांत: टप्प्याटप्प्याने मिळणार एकूण 26% दर कपात
फडणवीस यांनी काय म्हटल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दर कमी करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आणि MERC ने ती मान्य करत ऐतिहासिक निर्णय दिला. पूर्वी वीजदर वाढीच्या याचिका सादर केल्या जात असत, मात्र यावेळी महावितरणने जनतेच्या हितासाठी दर कपातीसाठी पुढाकार घेतला.
कोणाला होणार सर्वाधिक फायदा
घरगुती ग्राहक
औद्योगिक ग्राहक
व्यावसायिक ग्राहक
राज्यातील ७०% ग्राहक १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात.
या ग्राहकांसाठी दर कमी होण्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
दर कपात कशामुळे शक्य झाली
फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 युद्धपातळीवर राबवली जात असून, त्यात दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा देण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर हरितऊर्जेवर लक्ष केंद्रित करून वीज खरेदी खर्चात मोठी बचत करण्यात येत आहे. याच बचतीमुळे वीज दर कपात करणे शक्य झाले आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…
पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…
मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…