महाराष्ट्र

अण्णासाहेब पाटील महामंडळात मोठा फेरबदल; नरेंद्र पाटलांच्या मागणीला यश, एमडी विजयसिंह देशमुखांची बदली

मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती

मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कारभारावरून गेल्या काही महिन्यांपासून अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्यातील मतभेद चर्चेत होते. महामंडळाचा कारभार संथ असल्याचा, तसेच पोर्टल बंद ठेवण्यात आल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता. देशमुख यांच्या बदलीची मागणीही त्यांनी केली होती. अखेर या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, विजयसिंह देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अविनाश रणखांब यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अण्णासाहेब पाटील महामंडळातील अध्यक्ष आणि एमडी यांच्यातील वादाची राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. नरेंद्र पाटील यांनी देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महामंडळाचा कारभार अपेक्षित गतीने होत नसल्याचा आरोप केला होता. तसेच महामंडळाच्या पोर्टलशी संबंधित समस्यांमुळे तरुण उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या मराठा समाजातील तरुण उद्योजकांमध्येही एमडींच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी असल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी केला होता. मंजूर झालेल्या काही तरुणांचे एलओआय अचानक रद्द झाल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या सर्व बाबींची दखल घेऊन नरेंद्र पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू केला होता.

पाच जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांना अहवाल

नरेंद्र पाटील यांनी नुकताच पाच जिल्ह्यांचा दौरा केला होता. या दौऱ्यात मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी त्यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता. महामंडळाच्या माध्यमातून कर्ज व आर्थिक सहाय्य मिळवताना येणाऱ्या अडचणी तसेच प्रलंबित प्रकरणांचा मुद्दाही त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता.

विखे पाटलांचीही घेतली होती भेट

तरुण उद्योजकांच्या तक्रारीनंतर नरेंद्र पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी महामंडळाच्या कारभाराबाबत तसेच व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी मांडल्या होत्या.

नरेंद्र पाटील यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना ‘मराठाद्वेषी अधिकारी’ असे संबोधले होते. त्यांच्या कार्यपद्धतीचा फटका मराठा समाजातील तरुण उद्योजकांना बसत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. या आरोपांमुळे महामंडळातील अंतर्गत वाद चांगलाच चर्चेत आला होता.

दरम्यान, आता विजयसिंह देशमुख यांची बदली झाल्याने या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी अविनाश रणखांब यांची नियुक्ती करण्यात आली असून, महामंडळाचा कारभार आता नव्या नेतृत्वाखाली कोणत्या दिशेने जातो, याकडे तरुण उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

6 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

7 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

8 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

8 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

8 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

8 तास ago