महाराष्ट्र

संसद परिसरात प्रियंका गांधी आणि भाजप खासदार आमनेसामने;

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी संसद भवन परिसरात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि भाजप खासदार मुकेश दलाल आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले.

प्रियंका गांधी संसद भवनाकडे जात असताना भाजप खासदार मुकेश दलाल यांनी ‘राहुल गांधी शर्म करो, शर्म करो’ अशा घोषणा दिल्या. त्यांच्या हातात झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करणारे पोस्टर होते. ‘झारखंडमध्ये विद्यार्थ्यांसोबत झालेल्या कथित निर्दयतेवर राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे’, अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली.यावेळी प्रियंका गांधी यांनी मुकेश दलाल यांना राहुल गांधी झारखंडमधील विद्यार्थ्यांना भेटल्याचे सांगितले. त्यावर त्या पुढे निघून गेल्या. मात्र, मुकेश दलाल यांनी राहुल गांधी यांच्या झारखंड दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘राहुल गांधी झारखंडला कधी गेले?’

मुकेश दलाल म्हणाले, “राहुल गांधी यांनी झारखंडचा दौरा कधी केला? राहुल गांधी आणि केजरीवाल झारखंडला जाण्याची हिंमत का दाखवत नाहीत? प्रियंका गांधी यांनी मला सांगितले की राहुल गांधी यावर काम करत आहेत. त्यामुळे मी त्यांना विचारले की राहुल गांधी अजून झारखंडला का गेले नाहीत?”

दरम्यान, संसद परिसरातील हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. दिल्लीतील Gen Z आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज आणि राम मंदिरातील दान चोरीच्या कथित प्रकरणावरून विरोधक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उत्तराची मागणी करत आहेत. सभागृहात गोंधळ सुरू असल्याने कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे.सरकारच्या बाजूने अमित शाह सभागृहात उत्तर देण्यास तयार असल्याचे सोमवारी सांगण्यात आले. मात्र, त्यासाठी विरोधकांनी चर्चेत सहभागी होऊन सरकारचे उत्तर ऐकावे, अशी भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली आहे.

‘विरोधी पक्ष यावर गप्प का?’

दरम्यान, भाजपने आता झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनातील कथित लाठीचार्जच्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरण्यास सुरुवात केली आहे. “या मुद्द्यावर विरोधी पक्ष गप्प का?” असा सवाल भाजप नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

या मुद्द्यावरून एनडीएच्या खासदारांनी मंगळवारी संसद परिसरात मार्च काढला. या मार्चवर प्रतिक्रिया देताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “मी पहिल्यांदाच सरकारच्या खासदारांना प्रदर्शन करताना पाहत आहे.”“आम्ही यांना मजबूर केलं आहे. आता यांनी सभागृहात येऊन उत्तर द्यावं,” असा टोलाही प्रियंका गांधी यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला.त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यातही सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

6 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

7 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

7 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

7 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

7 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

7 तास ago