प्रश्नोत्तराच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिली थातुर मातुर उत्तर
नागपूर: राज्यात अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही,सोयाबीनला हमीभाव मिळत नाही याबाबत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी थातुर मातुर उत्तर दिली यावरून विरोधक संतापले. सरकारने दिलेले उत्तर म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या काळात वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था सभागृहात मांडली. सीसीआयने कापूस खरेदीसाठी टाकलेल्या अटीमुळे कापूस खरेदी केला जात नाही. कापूस खरेदीची मर्यादा देखील कमी आहे. कापसावर जो आयात कर १२ टक्के होता तो आता शून्य टक्के झाला आहे. परदेशातून भारतात कापूस आल्यावर कापसाचे भाव पडणार..कापसाच्या ५० पैकी ४० गाड्या परत पाठवल्या जातात. शेतकरी काय करणार? दुसरीकडे सोयाबीन खरेदी केंद्रावर ५३०० रुपयाने सोयाबीनची खरेद होत नाही. मंत्री बिल्डिंग मध्ये बसतात आमच्याबरोबर शेतकऱ्यांच्या बांधावर या म्हणजे खरी परिस्थिती कळेल अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
सोयाबीन केंद्रावर देखील ७० टक्के सोयाबीन परत पाठवला जात आहे..सरकार सोयाबीनची सरसकट खरेदी करणार का? कापसावरील आयात कर बाबत केंद्राकडे पाठपुरवठा करणार का? असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले. पण त्यावरही मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रश्नावर आज बैठक घेण्याचे निर्देश दिले.
सरकारने आपली भूमिका सभागृहात मांडावी,बैठक का घेण्यात येते हा आक्षेप विरोधकांनी घेतला. पण सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, रोहित पवार, सिद्धार्थ खरात हे वेलमध्ये गेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारीच्या भूमिकेविरोधात विरोधकांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…