शिरूर तालुका

सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलच्या सोहम अभिषेक जाधव यांची चमकदार कामगिरी,शालेय कॅरम स्पर्धेत राज्यस्तरीय निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): क्रीडा युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आयोजित कॅरम स्पर्धा, वयोगट १४ या स्पर्धेसाठी पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमधून पार पडलेल्या कॅरम स्पर्धा निवड प्रक्रियेतून सोहम अभिषेक जाधव याने उल्लेखनीय यश मिळवून राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे. त्याच्या या यशामुळे विद्यालयाचे चेअरमन मा. अनिल पायस सर व मुख्याध्यापिका नॅन्सी पायस यांनी त्याचे विशेष कौतुक केले.

सोहम हा सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल, शिरूर येथे इयत्ता ८वी चा विद्यार्थी असून, त्यांच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ त्यांना या मोठ्या व्यासपीठावर मिळाले आहे.अहिल्यानगर क्रीडा शिक्षण अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे देखील सोहमच्या या यशाचे कौतुक केले. या स्पर्धेसाठी अभिषेक जाधव सर यांनी मार्गदर्शन केले आहे.

स्पर्धेदरम्यान सोहमने दाखविलेली कौशल्य, शिस्तबद्धता आणि आत्मविश्वास यामुळे परीक्षकांनी त्यांची निवड राज्यस्तरीय पातळीवर केली. मुख्याध्यापकांनी तसेच त्यांच्या शिक्षकांनी आणि पालकांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला असून पुढील पायरीतही सोहम उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. सोहमच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून, शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठीही हे प्रेरणादायी ठरले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

18 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago