महाराष्ट्र

शिंदेंचा ‘षटकार’; ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेत दाखल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हा प्रवेश बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय असल्याचे सांगितले. “२०२२ मध्ये ४० आमदारांसह सुरू झालेल्या लढ्याचा हा दुसरा टप्पा आहे. आता एक नाही तर सहा टायगर आमच्यासोबत आले आहेत. चौकार नाही, षटकार मारला आहे,” असे ते म्हणाले.

शिंदे यांनी सांगितले की, बाळासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा असलेले शिवसैनिक अखेर शिवसेनेतच एकवटतात. विकास, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि जनतेची कामे या उद्देशानेच या खासदारांनी पक्षात प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला.

प्रवेश केलेल्या खासदारांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना शिंदे यांनी संजय बंडू जाधव यांना जमिनीशी नाळ जोडून काम करणारे नेते, संजय दिना पाटील यांना सामान्य माणसांचा कैवारी, तर ओमराजे निंबाळकर यांना “रिअल स्टार” असे संबोधले. भाऊसाहेब वाकचौरे यांचेही त्यांनी विशेष स्वागत केले.

२०२२ च्या बंडानंतर आपल्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना शिंदे म्हणाले की, त्या वेळी अनेकांनी एकही आमदार निवडून येणार नसल्याचा दावा केला होता. मात्र जनतेने त्यांचा निर्णय स्वीकारला आणि मोठ्या संख्येने आमदार निवडून दिले. राज्यातील विकासकामे, लाडकी बहीण योजना आणि शेतकरी हिताच्या योजनांमुळे शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.

“दिलेला शब्द पाळणे हीच आमची ताकद आहे. नव्याने पक्षात आलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामे आणि प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील,” अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून विकासकामांना आणखी गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट करत नाही. आज सहाही खासदार शिवसेनेत सामील झाले असून ऑपरेशन टायगर पूर्णपणे यशस्वी झाले आहे.”

या कार्यक्रमाला शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदार आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. सहा खासदारांच्या प्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

18 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

1 दिवस ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

3 दिवस ago