महाराष्ट्र

सरकारचा ऐतिहासिक निर्णय, शेततळे, विहीर बांधकामासाठी माती अन् खडीवरील रॉयल्टी माफ

राज्य सरकारचा मोठा निर्णय  

मुंबई: राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकरी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेततळे, विहीर बांधकाम किंवा शेत पाणंद रस्ता तयार करण्यासाठी लागणाऱ्या माती आणि खडीवर (गौण खनिज) रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा

शेततळे, विहीर बांधकाम आणि शेत रस्त्यासाठी आवश्यक असलेली माती आणि खडी मोफत मिळणार!

गावतळी, पाझरतलाव, बंधाऱ्यातील गाळ शेतात वापरण्यास मोकळीक

पाणंद रस्ते तयार करण्यासाठीही रॉयल्टी माफ

शेतकऱ्यांना अर्ज फी आणि रॉयल्टी भरावी लागणार नाही.

शेतकऱ्यांना स्वखर्चाने माती, खडी, गाळ वाहून नेण्याची परवानगी मिळणार

घरकूल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा

घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना विहीर आणि घर बांधण्यासाठी गौण खनिज मोफत मिळणार

ग्रामपंचायत, नगरपालिका आणि सरकारी बांधकामांसाठीही माती-खडीचा वापर शक्य

ठेकेदारांकडून रॉयल्टी वसूल होणार

ग्रामपंचायत व नगरपालिका बांधकामांमध्ये रॉयल्टी मूळ अंदाजपत्रकात समाविष्ट आहे

तहसीलदारांनी ठेकेदारांच्या बिलातून रॉयल्टी वसूल झाल्याची खात्री करावी

शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा 

शेततळे, शेतविहिरी, पाझरतलाव, महसुली नाले, बंधारे बांधकाम, लघुसिंचन तलावांचे खोलीकरण व सरळीकरण

पूरनियंत्रण उपाय व पूरहानी थांबवण्यासाठी खोलीकरण योजनांतर्गत मोफत माती आणि खडी

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गतही लाभ

शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा दिलासा.

शेतीसाठी हवी असलेली माती आणि खडी आता रॉयल्टी मुक्त

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago