महाराष्ट्र

महाराष्ट्रासह 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल बदलले, वाचा संपूर्ण यादी…

औरंगाबाद: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले असून देशातील 13 प्रांतांचे गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर बदलण्यात आले आहेत. याची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्र, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि झारखंड अशा अनेक मोठ्या राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. तसेच काही राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सध्या कोणत्याही राज्याचे राज्यपाल करण्यात आलेले नाही.

राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांची यादी खालीलप्रमाणे…

रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र

लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश

लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्कीम

सीपी राधाकृष्णन, राज्यपाल, झारखंड

शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश

गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम

निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश

विश्वभूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगड

अनुसुईया उईके, राज्यपाल, मणिपूर

एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड

फागू चौहान, राज्यपाल, मेघालय

राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार

ब्रिगेडियर (निवृत्त) बी.डी. मिश्रा, लेफ्टनंट गव्हर्नर, लडाख

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, सरसकट कर्जमाफी करा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

1 तास ago

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

2 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

3 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

3 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

3 दिवस ago