महाराष्ट्र

ग्रामसभा आणि तुमचे अधिकार! गावाच्या विकासाची खरी किल्ली

औरंगाबाद: गावाचा विकास म्हणजे केवळ सिमेंटचे रस्ते, इमारती किंवा योजना नव्हते

तर गावातील प्रत्येक नागरिकाचा निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग म्हणजेच खरा विकास होय

याच लोकशाही सहभागाचे सर्वात प्रभावी व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा.

इथेच नागरिक थेट ग्रामपंचायतीला प्रश्न विचारू शकतात, सूचना देऊ शकतात आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

ग्रामसभेत नागरिकांना मिळणारे ७ महत्त्वाचे अधिकार

निर्णय घेण्याचा अधिकार

गावात कोणती कामे प्राधान्याने करायची – रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य – याचा अंतिम निर्णय ग्रामसभेत घेतला जातो.

हिशोब तपासणीचा अधिकार

ग्रामपंचायतीला मिळालेला निधी किती आहे आणि तो कुठे खर्च झाला, याचा संपूर्ण लेखाजोखा पाहण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.

दप्तर तपासणीचा अधिकार

मस्टर रोल, कॅशबुक, मागील ग्रामसभांचे इतिवृत्त यांची तपासणी करण्याची मागणी ग्रामसभेत करता येते.

लाभार्थी निवडीचा अधिकार

घरकुल, पेन्शन, शेती व इतर शासकीय योजनांचे लाभार्थी ग्रामसभेतच निवडले गेले पाहिजेत.

महिला सभेचा अधिकार

मुख्य ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिला सभा घेणे बंधनकारक आहे.

महिलांनी मांडलेले पाणी, स्वच्छता व आरोग्य विषयक प्रश्न मुख्य ग्रामसभेत मांडणे आवश्यक आहे.

सामाजिक अंकेक्षणाचा अधिकार

मनरेगा व इतर विकासकामांची गुणवत्ता, खर्च व अंमलबजावणीची प्रत्यक्ष तपासणी ग्रामसभा करू शकते.

प्रशासनाला जाब विचारण्याचा अधिकार

कामे निकृष्ट असतील किंवा रखडली असतील, तर सरपंच व ग्रामसेवकांना थेट जाब विचारण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.

 

गणसंख्या

एकूण मतदारांच्या किमान १५ टक्के किंवा १०० नागरिकांची उपस्थिती आवश्यक असते.

ग्रामसभा कधी होते

वर्षातून किमान ४ ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.

साधारणपणे

२६ जानेवारी

१ मे

१५ ऑगस्ट

२ ऑक्टोबर

ठराव

ग्रामसभेत बहुमताने मंजूर झालेला ठराव ग्रामपंचायतीवर बंधनकारक असतो.

ग्रामसभेत सहभागी का व्हावे

भ्रष्टाचार रोखण्यासाठी

प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी

आपल्या वॉर्डातील समस्या मांडण्यासाठी

गाव आत्मनिर्भर व प्रगत बनवण्यासाठी

जेव्हा नागरिक जागरूक होतो, तेव्हाच गाव आदर्श बनते

पुढच्या ग्रामसभेला नक्की उपस्थित रहा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

20 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

20 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

21 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

2 दिवस ago