महाराष्ट्र

त्यानं लाल दिव्याचं जाळं टाकलं, त्या फसत गेल्या

जळगाव: जळगावच्या धरणगाव येथील एका तरुणाने नायब तहसीलदार, क्लास वन ऑफिसर असल्याचे सांगून लग्नाच्या नावाने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे असे तरुणींची फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मॅट्रिमोनियल साइटवरून तरुणींचे संपर्क क्रमांक मिळवून त्याने फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

तरुण जळगाव जिल्ह्यातील असल्याने याप्रकरणी नाशिक व फलटणच्या तरुणींनी जळगावात पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. वेगवेगळ्या बहाण्याने तरुणींकडून एकूण 15 लाख उकळून तरुणाने फसवणूक केल्याचेदेखील समोर आले आहे.

सरकारी लाल दिव्याच्या वाहनातील तसेच तहसीलदारांच्या खुर्चीवर बसलेले फोटो पाठवून अधिकारी असल्याचे सांगत तरुणाने विश्वास संपादन केल्याचे तरुणींनी बोलताना सांगितले. तरुणाचे लग्नदेखील झाले असून त्याच्या पत्नीने घटस्फोटाबाबत नाशिक न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. नाशिक येथे जाऊन माहिती घेतल्यावर ही बाब समोर आल्याचे तरुणींनी बोलताना सांगितले.

पोस्टिंग करावयाची असल्याचा बहाणा करून दोन तरुणींकडून अनुक्रमे 7 लाख व 8 लाख रुपये असे एकूण 15 लाख उकळून तरुणाने फसवणूक केल्याचेदेखील तरुणींनी बोलताना सांगितले. तरुणाचे सर्व फोटो व पैशाचे पुरावे दोन्ही तरुणींनी जळगावात पोलीस अधीक्षकांकडे सादर केले आहेत. या भामट्याने आतापर्यंत अशाच प्रकारे सहा तरुणींना फसवले अशी माहिती समोर आली आहे.

त्यामुळे त्याला अटक व्हावी, उकळलेली रक्कम परत मिळावी व भविष्यात आणखी तरुणींची फसवणूक होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरुणींनी केलेल्या तक्रारीची जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेतली आहे. निनाद विनोद कापुरे याच्याविरुद्ध राज्यात इतरही जिल्ह्यात गुन्हे दाखल असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

3 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

3 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

3 तास ago