मोठी बातमी! आदित्य ठाकरे-फडणवीस एकाच हॉटेलमध्ये एकत्र, नेमकं सत्य काय?

मुंबई: राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकारणात नवे समीकरण तर उदयास येणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुंटूंब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटी गाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आता हे दोन्ही नेते एकत्र असल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या दोघांमध्ये भेट झाली नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिली होती ऑफर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली होती. ‘उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती.

उद्धव ठाकरे काय म्हणाले

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या ऑफर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात आणि त्या गोष्टी खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात.’

उद्धव ठाकरे-फडणवीसांची झाली होती भेट

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती. या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी, ‘हिंदी सक्ती हवीच कशाला या लेखाचा संग्रह प्राप्त झाला, ठाकरेंनी काल दिलेलं पुस्कक मी वाचलं. कुणी कुणाला भेटलं म्हणजे युतीसाठी भेटलं असं होतं नाही’ असं स्पष्टीकरण दिले होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

11 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

11 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

11 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

11 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

11 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

11 तास ago