रुग्णालयाच्या कार्यपद्धती व व्यवस्थापनाचे केले कौतुक
नागपूर: महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांनी आज नागपूर येथील डागा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची सखोल पाहणी करून विविध विभागांचा आढावा घेतला.
रुग्णालयातील ओपीडी, वॉर्ड, प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया कक्ष तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत सेवा-सुविधांबाबत माहिती घेतली.डागा स्त्री रुग्णालयामध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार आरोग्यसेवा, शिस्तबद्ध कार्यपद्धती तसेच प्रभावी व्यवस्थापनाबाबत आरोग्यमंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांनी समाधान व्यक्त केले. रुग्णालय प्रशासन, डॉक्टर व कर्मचारी यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
महिला व मातृआरोग्यासाठी डागा स्त्री रुग्णालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून भविष्यातही रुग्णांना अशाच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.यावेळी डॉ. दिलीप मडावी, वैद्यकीय अधीक्षक; डॉ. शीतल मेहता; डॉ. शमसुन खानम, अतिरिक्त शल्य चिकित्सक; श्रीमती ललिता मेश्राम, अधिसेविका; श्रीमती आशा मेटांगे, अधिसेविका; डॉ. सीमा पार्वेकर, स्त्रीरोग तज्ज्ञ (वर्ग-१) तसेच डागा स्त्री रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…